इंग्रजी अध्ययन समृद्धी तालुकास्तरीय स्पर्धेत वराळे शाळेची चमकदार कामगिरी
वराळे:
माळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पंचायत समिती मावळच्या वतीने घेण्यात आलेल्या मावळ तालुकास्तरीय इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धेत वराळे येथील जिल्हा परिषद शाळेने चमकदार कामगिरी केली आहे.
इंग्रजी विषयाशी निगडीत विविध नऊ प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आला.मावळ तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथ. शाळा वराळे शाळेतील
शब्द संपत्ती स्पर्धा गट ५ वी /६ वीत कु.श्रावणी प्रमोद मराठे -प्रथम क्रमांक इयत्ता- ६ वी मार्गदर्शक – उज्वला साळुंके व संतोष भारती.
शब्द संपत्ती स्पर्धा गट ७ वी /८ वीत जयदीप सुधाकर पवार – प्रथम क्रमांक इयत्ता- ७ वी मार्गदर्शक – अशोक बारवे.
वक्तृत्व स्पर्धा – गट- ५ वी/ ६वीत कु.काजल नरसिंह उल्लोज प्रथम क्रमांक,इयत्ता – ५ वी मार्गदर्शक- सुरेखा पडवळ व गंगाराम शेळके.या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
विजेत्या स्पर्धकांचे जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे,विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज,रजनी माळी,राजश्री सटवे,सुनील माकर,केंद्रप्रमुख शोभा गुप्ते, सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य,अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती,वराळे यांनी कौतुक केले .
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या यशस्विततेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा खोमणे,नलिनी नांद्रे,मंगल जगदाळे,अरुणा रासकर,पूनम कानगुले यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!