गडद” गावातील दुर्गेश्वर लेणी तील महादेव
गडद:
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील “गडद” गाव. चाकण-वांद्रे या रस्त्यावर गडद फाटा येथे उतरल्यावर सर्व प्रथम नजरेत भरतो तो येथला प्रचंड मोठा डोंगर, एकाद्या मातेने आपल्या बालकाला आपल्या मिठीत घ्यावे तसा डोंगर गावच्या भोवती पसरला आहे. जसे काही सह्याद्रीच गावाला कवेत घेउन बसला आहे.
वाटेत काही ओढे नाले ओलांडले की आपण थेट गडद गावात पोचतो.
गाव तसा लहान आहे. उंच टेकडीवर तो वसला आहे. अगदी घराच्या दारात उभे राहीले की सर्व खलाटी नजरे च्या टप्प्यात येते. घराचे दरवाजे तर अभिजात नम्रता शिकवणारे. गडद गावात आले की चावडी लागते आता याच चावडीचे विठ्ठल रखुमाई मंदीर झाले आहे. येथुन पुढे गेले की भैरवनाथ मंदीर व मारुती मंदीर लागते ही दोन्ही ही मंदीरे अतंत्य सुरेख आहेत. येथुन पुढे जंगलाची वाट चालू होते.
मावळ खोर्यात काही ठिकाणी देवराई यांची जपवणुक केली जाते तशीच येथे आंबेराईची जपवणुक केली आहे. डोंगराच्या तळाशी शेकडो आंब्याची झाडे आहेत. अगदी जुनाट आणी प्रचंड मोठी, आकाशाशी स्पर्धा करण्या जोगी. सुर्यकिरण ही येथे जमीनीवर पोचत नाही ईतकी याची घनता आहे. याच आंबेराईतुन दुर्गेश्वर लेणी कडे जाणार्या पायर्या सुरू होतात. पायर्या चढत गेलो की पहीला टप्पा लागतो तो महादेवाचा येथे येई पर्यंत दमछाक होते.
पण येथे आल्यावर आपल्या समोर एक आश्चर्य दिसते समोर छोटीसी गुहा आहे. या गुहेत महादेवाची पिंड आहे आणी विशाल अशा काळ्या पत्थरातुन तीच्यावर कायम जलाभिषेक होतो आहे. हा जलाभिषेक निसर्गाच करतो आहे. हे दृश्य पाहीले की निसर्गही देवा पुढे कसा लिन होतो याची खात्री पटते. येथ पर्यंतचा प्रवास काहीसा सोपा आहे पण येथुन पुढील दुर्गेश्वर लेणी पर्यंत चा प्रवास अतंत्य खडतर आहे.
ज्यांची मनाची तयारी आहे आणी ज्याच्या कडे धाडस आहे तोच हा प्रवास करू शकतो. कारण येथुन पुढील चढण ही डोंगराच्या कड्याने चढायची आहे आपल्या पायाखाली फक्त एक फुटाची पायरी हाच काय तो एक मेव आधार बाकी चढण पालीसारखा दगडाला चिटकुन करावा लागतो.जर आपण मान वळवुन जरी मागे पाहीले की हजार फुटाची दरी दिसते जर का आपला पाय पायरी वरून निसटला तर कसलाच आधार नाही सरळ कडेलोटच झाला असे समजावे.
याच प्रवासात फुटकी पायरी येते काही कारणास्तव येथील एक पायरी नाहीशी झाली आहे. येथे आले की ब्रम्हांड आठवते कारण येथे पायरी तुटून गेल्या मुळे दोन्ही हाताची बोटे अडकविण्या साठी खडकात उखळी पाडलेली आहेत त्या उखळीत बोटे घालुन शरीराला पाच सहा फुट वर ढकलावे लागते.तेव्हाच वरच्या पायरी पर्यंत पोचता येते.अशा प्रकारे जिवाची बाजी लावुन आपण अखेर कोरीव लेण्या पर्यंत पोचतो.एकदा वर गेलो की मन अगदी प्रसन्न होते.
जागो जागी खोदलेले पाण्याचे हौद नजरेत भरतात.त्याच एका हौदातील थंडगार पाणी पिले की सगळा शिण नाहीसा होतो.वरती साधू बाबाचा मठ कोरीव लेणी या मध्ये खोली आहे लहान से दुर्गेश्वराचे मंदीर आहे. येथुन निसर्गाचे दृश्य विलोभनीय दिसते.
आणी ही लेणी पहायचे धाडस केले यांचे समाधान वाटते.
आपणाला थ्रिल अनुभवायचे असेल व ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण या महाशिवरात्री निमीत्त गडद गावातील दुर्गेश्वर लेणी मधिल महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आवश्य या.. गडद ग्रामस्थ आपले स्वागत करीत आहेत.
मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले,”
लेण्यांचे काम चालू असताना कोणते तरी तात्कालीन कारण असे घडले की काम करणाऱ्यांनी ते काम अर्धवट च सोडले. आपण ही लेणी पहायला आलात तर वाटाड्या सोबत घ्या तोच आपल्याला वरती घेउन जावु शकतो कारण कोठे कसा पाय द्यायचा, हाताचा आधार कसा घ्यायचा, अगदी डावा पाय पायरीवर टाकायचा की उजवा याची ही माहीती घ्यावी लागते कारण आपल्याला वळण्या येवढी ही जागा पायरीवर नाही.

error: Content is protected !!