टाकवे प्राथमिक आरोग्य केंद्रात महिंद्रा कंपनीकडून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध
टाकवे बुद्रुक :
टाकवे प्राथमिक आरोग्य केंद्राला महिंद्रा कंपनीकडून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात या हेतूने कान्हे येथील महिंद्रा एक्ससोलो कंपनीच्या सीएसआर फंडातून अत्याधुनिक प्रस्तुती बेड देण्यात आला आहे.दरम्यान टेबलचा फायदा फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन साठी होणार आहे या टेबलवरती गादी उशी असल्यामुळे पाठदुखीचा त्रास होत नाही व टेबलला रिमोट सिस्टीम असल्यामुळे टेबल वर खाली होण्यास मदत होऊन डॉक्टरांना ऑपरेशन वेळी चांगल्या प्रकारे या टेबलचा उपयोग होणार आहे.
यासाठी टाकवे गावतील सामाजिक कार्यकर्ते संकेत जगताप, सरपंच भूषण असवले पोलीस पाटील अतुल असवले यांनी विशेष पाठपुरावा करून हे साहित्य कान्हे येथील एक्सलो महिंद्रा कंपनीकडून उपलब्ध करून घेतले.
या सुविधांमुळे ग्रामीण भागातील महिलांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीने अत्याधुनिक प्रस्तुती बेड असतात, त्याच पद्धतीचा बेड याठिकाणी महिला रुग्णांच्या सेवेसाठी देण्यात आला असून महिलांच्या प्रस्तुतीवेळी डॉक्टरांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी मदत होणार आहे.
ज्याप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये आत्मनिर्भर भारत संकल्पना राबवण्यात येत आहे. त्याच पद्धतीने इतर क्षेत्रातही आत्मनिर्भर भारत संकल्पना राबविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत यापुढेही ग्रामीण भागातील सुविधा देण्यासाठी महिंद्रा कंपनी सदैव अग्रेसर राहील. पुढील काळात कंपनीच्या माध्यमातून आरोग्य केंद्रात ‘फाईव्ह येस प्रशिक्षण देण्यात येईल,अशी माहिती प्लॅन्ट चिप ऑफिसर लक्ष्मण महाले यांनी दिला.
यावेळी वेळी प्रस्तुती बेडच्या उद्घाटन प्रसंगी प्लॅन्ट चिप ऑफिसर लक्ष्मण महाले, कमर्शियल हेड जगदीश परब, सरपंच भुषण असवले, उपसरपंच परशुराम मालपोटे, सदस्या ज्योती आंबेकर,संकेत जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा आरोटे, डॉ. शैलेश साठे, डॉ. शेख, सुपरवायझर आनंद साबळे, कुणाल पांडे, अभिजात जाधव आदीजण उपस्थित होते.

error: Content is protected !!