तालुकास्तरीय इंग्रजी नाट्य स्पर्धेत बधलवाडी शाळेचे यश
नवलाखउंब्रे:
पुणे जिल्हा परिषदेच्या दहा कलमी योजनेअंतर्गत ‘इंग्रजी अध्ययन समृद्धी तालुकास्तरीय इंग्रजी नाट्य स्पर्धेत’ नवलाख उंबरे केंद्रातील बधलवाडी शाळेने प्रथम क्रमांक प्राप्त केला.यावेळी झालेल्या बक्षीस वितरण समारंभास गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे,विस्तार अधिकारी सुदाम वाळूंज,रजनी माळी,राजश्री सटवे,रामराव जगदाळे,मिनिनाथ खुरसुले इ.मान्यवर उपस्थित होते. माळवाडी येथे झालेल्या या स्पर्धेत इंग्रजी कविता गायन,शब्दसंपत्ती,नाट्यीकरण,प्रश्नोत्तरे इ.स्पर्धा घेण्यात आल्या.
नाट्यीकरण स्पर्धेसाठी आवश्यक तयारी इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका अन्नपूर्णा शेटे यांनी करवून घेतली.शाळेच्या यशाबद्दल मुख्याध्यापिका छाया महाजन यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.
बधलवाडी शाळेच्या चमकदार कामगिरीने अत्यानंद वाटला अशी प्रतिक्रिया सरपंच चैताली कोयते व उपसरपंच राहूल शेटे यांनी व्यक्त केली.तालुकास्तरीय स्पर्धेतील यशाबद्दल केंद्रप्रमुख मिनिनाथ खुरसुले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन बधाले,उपाध्यक्षा वैशाली सातपुते यांनी तसेच सर्व सदस्य व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!