माळेगाव खुर्द:
ग्रामदूत प्रकल्पांतर्गत माळेगाव येथील शेतकऱ्यांसाठी शेती अभ्यास या नोपक्रमांचा आयोजन करण्यात आले. अशोक सिंघल मेमोरियल ट्रस्ट आणि सेवावर्धिनी, संचलित ग्रामदूत प्रकल्पाअंतर्गत माळेगाव (खु .) येथील श्री भैरवनाथ शेतकरी समूहासाठी,ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा येथील शेतकऱ्यांनी राबवलेल्या शेतीतील नोपक्रमांचा अभ्यास सहल घडवून आणली.
प्रकल्प व्यवस्थापक माणिक गवळी यांनी अभ्यास भेटीचे नियोजन केले होते. भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी खालील विषयांची पाहणी व अभ्यास केला.
.मोखाडा
प्रगती प्रतिष्ठान जव्हार यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली एकूण अकरा शेतकरी गटांनी मिळून, मोखाडा तालुक्यातील मोरचुंडी या गावातील 108 शेतकऱ्यांनी सोलर एनर्जी व ठिबक सिंचनावर आधारित ग्राउंड नट फार्मिंगला(भुईमूग शेती ) या उपक्रमाला भेट दिली व शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
मिरची लागवड, आंबा लागवड याचीही पाहणी केली. तसेच त्यावर आधारित उद्योगांची ही चर्चा केली.
आदिवासी जमातीतील कोकणी या आदिवासी कुटुंबाने सर्वांची जेवणाची व्यवस्था शेतात केली होती, त्याचा सर्व शेतकरी बांधवांनी आस्वाद घेतला व किटुंबाला धन्यवाद दिले.तिळ्याचापाडा येथील नळ पाणी योजना समजून घेतली.
जव्हार
प्रगती प्रतिष्ठान संचलित जव्हार येथील बांबू प्रशिक्षण केंद्राला भेट दिली, प्रशिक्षणात कोणकोणत्या वस्तू तयार केल्या जातात कशा तयार केल्या जातात, प्रशिक्षण किती दिवसाचे असते, मार्केटिंग कशी केली जाते या सर्व विषयाचा अभ्यास केला.
जव्हार येथील आदिवासी समाजाचा राजा श्री यशवंत मुकणे महाराज यांच्या राजवाडा ला भेट दिली.
पोशेरा येथील 38 वाड्या-वस्त्यांवर सोलर एनर्जी वर आधारित शेती केली जाते. त्यामध्ये आंबा लागवड, टोमॅटो लागवड, मोगरा लागवड, कारल्याची लागवड, या शेतीला भेट दिली व शेती आपल्या समजून घेतला.
वाडा.
केशवसृष्टी संचलित, देवगाव येथील शेतकऱ्यांसाठी मोगरा शेतीहा उपक्रम राबविण्यात येत आहे, या उपक्रमाला भेट दिली. शेतकऱ्यांकडून मोगरा लागवड, खतांचा वापर कालावधी, मोगरा तोडण्याची पद्धत, उपलब्ध मार्केट, व मोगरा चा बाजार भाव याचा अभ्यास केला. कमी जागेत खूप चांगल्या प्रकारची मोगरा शेती होऊ शकते त्यापासून अगदी चांगले उत्पन्न मिळू शकते याची खात्री शेतकऱ्यांना झाली.
वरील भेटीमुळे आंध्र मावळ भाग व जव्हार,मोखाडा,वाडा हा भाग भौगोलिक दृष्टा समान असून या सर्व शेतकर्‍यांकडे कमी शेती असून असुद्धा, प्रगती प्रतिष्ठान आणि केशव सृष्टी यांच्या शेतीविषयक प्रयोगातून व मार्गदर्शनातून , पाण्याची उपलब्धता कमी असली तरी कमीत कमी शेती मधून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून, सोलर एनर्जीच्या आधारावर चांगल्या प्रकारची शेती करता येऊ शकते व आपले उत्पन्न होऊ वाढू शकते असा सकारात्मक,दृष्टिकोन व मानसिकता शेतकऱ्यांची झाली, पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर आपण सुद्धा अशा प्रकारची शेती करू शकतो आणि करू असा दृढनिश्चय या शेतकऱ्यांनी केला. प्रकल्पांतर्गत शेती भेट अभ्यासाचे .सदर शेती अभ्यासासाठी माळेगाव येथील 11 शेतकऱ्यांचा सहभाग होता.
सदर शेती भेट यशस्वी होण्यासाठी प्रगती प्रतिष्ठान च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वीरेंद्रजी चंपानेरकर, श्री जयरामजी भस्मे, श्री धीरजजी यांनी व केशव सृष्टी च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री अविनाश गायकवाड साहेब, श्री संदेश बोरसे व त्यांचे सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच अंदर मावळ भागातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामदूत प्रकल्पाच्या वतीने श्री सुरेश पानसारी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रमोद कुलकर्णी व प्रकल्पप्रमुख हर्षण पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!