
इंग्रजी अध्ययन समृद्धी तालुकास्तरीय स्पर्धेत जांभूळ शाळेचा सार्थक ओव्हाळ प्रथम
जांभूळगाव:
पुणे जिल्हा परिषदेच्या दहा कलमी योजनेतील महत्त्वपूर्ण इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रमांतर्गत माळवाडी येथे झालेल्या तालुकास्तरीय WH- question या स्पर्धेत जांभूळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या सार्थक सुरेश ओव्हाळ या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला.
बक्षीस वितरण समारंभास पंचायत समिती मावळचे गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे,शिक्षण विस्तार अधिकारी सुदाम वाळूंज,रजनी माळी,राजश्री सटवे,रामराव जगदाळे,कृष्णा भांगरे,सुनिल माकर आदि उपस्थित होते.
जांभूळगाव शाळा ही उपक्रमशील शाळा असून विविध स्पर्धांमध्ये सातत्याने यश संपादित करत असते.सार्थकला वर्गशिक्षिका कविता जोशी यांनी मार्गदर्शन केले.जांभूळ येथील सरपंच,उपसरपंच,शा.व्य.समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी स्पर्धेतील यशाबद्दल सार्थकचे अभिनंदन केले.स्पर्धेतील यशाने समाधान वाटल्याचे मत मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी व्यक्त केले.सार्थकच्या चमकदार कामगिरीने जांभूळ परिसरात आनंद व्यक्त होत आहे.
- पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज देणार :- माऊली दाभाडे
- महिंद्रा कंपनी परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे आंदर मावळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
- गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
- बेलज येथे मदुरा मायक्रोफायनान्स लिमिटेड’ आणि ‘क्रेडिटऍक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाड्यांसाठी आवश्यक साहित्य वितरण
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर



