
किशोर आवारे यांच्या वतीने एसटी बस कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप
तळेगाव स्टेशन श
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या वतीने संपावर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. एसटी कर्मचार्यांच्या संपाचा १११ वा दिवस होता .
संपकाळात १११ दिवस किशोर आवारे यांनी दोन्ही वेळचे जेवण एसटी बांधवांना उपलब्ध करून दिले आहे. तसेच मागील महिन्यातही किराणा चे किट वाटप करण्यात आले होते.
कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यापासून पगार मिळत नसून विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम असल्यामुळे कर्मचारी बांधवांची आर्थिक ओढाताण होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत किराणा चा प्रश्न, वैद्यकीय औषधांचा प्रश्न , लहान मुलांची फी सुद्धा भरणे त्यांना अवघड झाले आहे.
एसटी कामगार बांधवांची आर्थिक हेळसांड कमी व्हावी यासाठी किराणा चे किट किशोर आवारे यांनी एसटी कर्मचारी बांधवांना उपलब्ध करून दिले आहे. या किटमध्ये एक महिना पुरेल एवढा किराणामाल आवारे यांनी उपलब्ध करून दिला आहे .आज सर्व एसटी कामगार सर्व कुटुंबासह एसटी आगारा समोर सुरु असलेल्या उपोषण स्थळी उपस्थित होते.
जना सेवा विकास समितीचे सर्व कार्यकर्ते नगरसेवक यांनी सर्व कामगार बांधवांची आपुलकीने विचारपूस केली. एसटी कामगार नेते दीपक दगडखैर यांनी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांचे आभार मानले तसेच एकशे अकरा दिवस सर्व राजकारणी लोकांनी पाठ फिरवून देखील सातत्याने दोन्ही वेळचे जेवण देणारा दानशूर नेता हा केवळ किशोर भाऊ आवारे असून कामगारांच्या आर्थिक अडचणी मध्ये आमच्या कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे किशोर भाऊ आमच्या पाठीशी सातत्याने उभे राहिल्याने आज आमच्या आर्थिक अडचणी कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले.
किशोर आवारे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात सामील असून इथून पुढे देखील काही मदत लागल्यास करण्यास तयार असल्याचे आश्वासन दिले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांचे राजकारण न करता त्यांच्या मागण्यां चा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा अशी अपेक्षा किशोर आवारे यांनी व्यक्त केली.
किशोर आवारे हे निस्वार्थी राजकीय व सामाजिक नेते असून तळेगावातील अनेक संकटांच्या प्रसंगी किशोर आवारे हे नेहमी समाजाच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले आपण सर्वांनी पाहिले आहे. किशोर आवारे यांचे करोना काळातील कार्य महान असल्याचे गौरवोद्गगार सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती फलके यांनी काढले.
याप्रसंगी नगरसेवक समीर खांडगे ,रोहित लांघे प्रवक्ते मिलिंद अच्युत, चंदन कारके, सुनिल पवार ,दिपक कारके
एसटी कामगार नेते दीपक दगडखैर,प्रशांत शेवाळे, प्रमोद नगरचे, विजय राऊत, बबन ढाकणे ,धनंजय मुंडे आदी कामगार नेते व कामगार बांधवांचा परिवार उपस्थित होते.
- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप
- सफर 361 किल्लांची ग्रुपकडून ढाक गडावर स्वछता मोहीम
पाण्याच्या टाकीला मारले जाळे स्वछता राखण्याचे केले आवाहन - भराव खचल्याने ढंपर उलटल्याची घटना
- साते येथील कंपनीत अडकलेल्या भेकरास वन्यजीवरक्षक संस्थेकडून जीवदान
- सावित्रीच्या लेकीची पायपीट थांबविण्यासाठी करंजगावात सायकल वाटप



