
मावळमित्र न्यूज विशेष:
‘ आवाज कोणाचा,आवाजा जनतेचा!दाही दिशेतून घुमला,राष्ट्रवादी पुन्हा! राष्ट्रवादीचे टायटल साँग राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करणारे आहे.या टायटल साॅगची आज मावळात पून्हा उजळणी होणार आहे.राष्ट्रवादी परिवार संवाद च्या संवाद कार्यकर्त्यांशी ,पक्षाच्या केंद्रबिंदूशी! या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीचे रणशिंग या जाहीर मेळाव्यात फुंकणार असल्याचे संकेत मिळत आहे.
यासाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली असून या मेळाव्यात राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन पहायला मिळेल. चार दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या तळेगाव दाभाडे व लोणावळा नगरपरिषद,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पूर्वेला होणा-या या संवाद मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उर्जा मिळणार आहे.आजची संवाद यात्रा किंबहुना संवाद मेळावा राष्ट्रवादी साठी चार्जिंग पाँईट ठरणार आहे.
मागील विधानसभा निवडणुकी पर्यत बॅकफूटला गेलेल्या राष्ट्रवादीला आमदार सुनिल शेळके यांच्या रुपाने कणखर चेहरा मिळाला.
आणि मावळात राष्ट्रवादीने कात टाकायला सुरुवात केली. जो जिता वहीं सिकंदर हे राजकारणातील साधे गणित राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वाने हेरले. राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या मावळात सोन्याचे दिवस आले असे म्हटले तरी वावगे ठरू नये. विधानसभेच्या पाठोपाठ असलेल्या सर्वच निवडणुकीत राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला. ग्रामपंचायत निवडणुकी पासून आगदी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पारडे जड राहिले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,पीएमआरडीएत राष्ट्रवादीने बाजी मारली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व सेल अॅक्टिव्ह राहिले. आमदार सुनिल शेळके व पक्षाचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी या सर्व सेल ला अॅक्टिव्ह ठेवून पक्ष संघटनेची पाळमुळे खोलवर रूजवली. त्यामुळे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ताठ मानेने मिरवू लागला. मागील दोन वर्षाच्या काळात आमदार सुनिल शेळके याच्या पुढाकाराने कोट्यावधी रुपयाच्या विकास कामांची भूमीपूजन आणि उद्घाटन सोहळे पार पडले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या भूमीपूजन व लोकार्पण सोहळा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याच देही याच डोळा पाहिला.या मेळाव्यात त्या नंतर देखील इतर पक्षाचे अनेक कार्यकर्त्यांनी हातात घड्याळ बांधले. याचाच अर्थ काय राष्ट्रवादीने जनाधार वाढू लागला आहे . पक्ष संघटनेच्या कामासाठी अनेकांनी स्वतःला झोकून दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पवना जलवाहिनी अंदोलनात जखमी झालेल्या कार्यकर्त्याचा आमदार सुनिल शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला. ही काही सामन्य बाब नाही.
मावळ करांनी ख-या अर्थाने राष्ट्रवादी विचार स्वीकारले याचे हे उत्तम उदाहरण आमदार सुनिल शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. या मेळाव्या नंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत होणारा हा तालुक्यातील आणखी एक शक्तिप्रदर्शन कार्यक्रम.या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकीचे बिगुल वाजवणार असल्याचे संकेत या मेळाव्याच्या जोरदार तयारी वरून दिसून येते. त्यात विरोधकांची ताकद कमी करण्यासाठी अनेकांचा पक्ष प्रवेश या मेळाव्यात होणार असल्याचे राष्ट्रवादीच्या कोटातून माहिती मिळतेय.
आगामी निवडणुकीतील इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कंबर कसली असून सोशल मीडियावर या आशयाच्या पोस्ट झळकू लागल्या आहेत. तालुक्यातील सत्ताकेंद्र ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी तयारीला लागली असताना विरोधक याचा कसा सामना करतेय हे पाहणे औचित्याचे ठरेल.
- रुग्णसेवेचे व्रत घेतलेले डॉ. विकेश कांतीलाल मुथा
- पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज देणार :- माऊली दाभाडे
- महिंद्रा कंपनी परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे आंदर मावळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
- गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
- बेलज येथे मदुरा मायक्रोफायनान्स लिमिटेड’ आणि ‘क्रेडिटऍक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाड्यांसाठी आवश्यक साहित्य वितरण



