पुणे:
सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून युक्रेन या देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पुणेचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हे आवाहन केले आहे.रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून युक्रेन या देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विद्यार्थी
तसेच नागरीकांसाठी खालील प्रमाणे हेल्पलाईन्स नवी दिल्ली येथे स्थापन करणेत आलेल्या आहेत.
केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली फोन टोल फ्री 1800118797 फोन – 011-23012113 / 23014105 / 23017905
फॅक्स 011-23088124
ईमेल situationroom@mea.gov.in
जर पुणे जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे फोन – 020-26123371 ईमेल- controlroompune@gmail.com
eami. वर संपर्क साधता येणार आहे.

(

error: Content is protected !!