टाकवे बुद्रुक:
पुणे जिल्हा परिषदेच्या शारदा ग्राम आरोग्य संजीवनी कार्यक्रमाअंतर्गत पुणे जिल्हा परिषद पुणे व प्राथमिक आरोग्य केंद्र टाकवे यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र टाकवे येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.
सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले,उपसरपंच परशुराम मालपोटे, सदस्य सुवर्णा असवले,,माजी सरपंच व सदस्य जिजाबाई गायकवाड,सदस्य ज्योती आंबेकर,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बबन ओव्हाळ आदि उपस्थित होते.
तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. पंचक्रोशीतील रूग्ण बहुसंख्येने उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी,तज्ञ डॉक्टर, कर्मचारी,आशा वर्कर्स यांनी
शिबिरासाठी परिश्रम घेतले

error: Content is protected !!