तळेगाव दाभाडे:
कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने त्याचा राजीनामा घ्यावा या मागणी साठी शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अंदोलन करण्यात आले. गुरुवारी दि.२४ रोजी सायंकाळी ७ वा. मारुती मंदीर चौक येथे निषेध आंदोलन झाले.
शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,माजी नगरसेवक श्रीराम कुबेर,जिल्हा सचिव संजय वाडेकर,भाजपा कोषाध्यक्ष सतिष राऊत,उपाध्यक्ष विनोद भेगडे,कामगार आघाडी अध्यक्ष अशोक दाभाडे, यांनी आपल्या भाषणांमध्ये महाविकास आघाडी सरकारचा निषेध करुन मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
निषेध मोर्चात भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून टाकला.
माजी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोककाळोखे,ज्येष्ठ नेते श्री.सुरेश झेंड,नगरसेविका शोभा भेगडे,व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राकेश ओसवाल,प्रभारी वैभव कोतुळकर,सरचिटणीस रजनी ठाकूर,महिला मोर्चा कार्याध्यक्षा अश्विनी काकडे,माजी सभापती निलेश मेहता,सहकार आघाडी अध्यक्ष संतोष परदेशी,भाजपा नेते अजय भेगडे,दिपक भेगडे ,वसंत भेगडे,शहर सचिव महावीर कणमुसे,सोमनाथ त्रिंबके,सोशल मिडीया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम,सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष दिनेश कुलकर्णी,ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन पोटे,कार्याध्यक्ष सचिन जाधव,कामगार आघाडी कार्याध्यक्ष स्वप्निल भेगडे,
युवती अध्यक्षा अपूर्वा मांडे,कार्याध्यक्षा धनश्री बागले,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक, सरचिटणीस दिलीप सुतार,विजयराव पंडीत,उपाध्यक्ष सुधीर खांबेटे, सुधाकर देशमुख,का.आ.उपाध्यक्ष सतिश पारगे,का.आघाडी सरचिटणीस आनंद पूर्णपात्रे,उपाध्यक्ष बाळासाहेब कडुसकर,माजी सरचिटणीस समीर भेगडे,भाजयुमो सरचिटणीस निखिल म्हाळसकर,अवधूत टोंगळे,ओबीसी मोर्चा युवा अध्यक्ष ऋषीकेश सुतार,प्रसिद्धीप्रमुख अमित भागीवंत,सचिव ललित गोरे,ओबीसी मोर्चा सचिव इशांत घाटकर, गिरीष भोळे, सचिन लोणकर,कैलास सांडभोर,संजय मालकर,राजू जाधव सुरज सातकर केदार भेगडे हे उपस्थित होते.
निषेध मोर्चाचे नियोजन सरचिटणीस रजनी ठाकूर, प्रदिप गटे, विनायक भेगडे,ओबीसी मोर्चा प्रसिद्धीप्रमुख अमित भागीवंत यांनी केले.

error: Content is protected !!