नवाब मालिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा: भाजप
वडगाव मावळ:
कॅबिनेट मंत्री असलेल्या नवाब मलिक यांना अटक झाली असून मालिकांचे कृत्य म्हणजे राष्ट्रविरोधी शक्तींना मदत करण्यासारखे आहे त्यामुळे तातडीने नवाब मालिकची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने वडगांव मावळ येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
दाऊद इब्राहिम ने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले. वेळोवेळी विघातक कृत्यांना चालना दिली त्या व्यक्तीशी कुठलेही आर्थिक व्यवहार म्हणजे देशद्रोह असून अशा व्यक्तीस मंत्रिपदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असा घणाघात भाजपने केला.
यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, माजी उपसभापती दत्तात्रय शेवाळे, सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी, वडगांव नगरपंचायत नगरसेवक प्रवीण चव्हाण, युवा मोर्चा कार्याध्यक्ष गणेश ठाकर, विध्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे, सहकार आघाडी अध्यक्ष अमोल केदारी, वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे, वडगाव शहर युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, नामदेव भसे, अमोल धिडे, संस्कार चव्हाण आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!