इंग्रजी अध्ययन समृद्धी बीटस्तरीय स्पर्धेत टाकवे बुद्रुक शाळेचे सुयश
टाकवे बुद्रुक:
जिल्हा परिषदेच्या दहा कलमी कार्यक्रमांतर्गत इंग्रजी अध्ययन समृद्धी या उपक्रमाच्या तळेगाव बीटच्या शालेय विद्यार्थ्यांच्या बीट पातळी वरील स्पर्धा निगडे येथे पार पडल्या .
या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टाकवे बुद्रुक च्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये “यश संपादन केले.
श्रेया शिवाजी शिंदे इ. ४ थी हिने wh-questions या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले . सरस्वती प्रताप ढंगे हिने kth-questions. इयत्ता ५वी हिने गट क्र.तीनमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.
) सेजल संतोष कोडे .७ वी हिचा wh-questions गट क्र.४ मध्ये तृतीय क्रमांक तर प्रियंका सुनिल शर्मा हिचा स्पेलिंग्ज पाठांतर स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.
समर्क सांधिक स्पर्धेत कवितागायन स्पर्धेत इयत्ता पहिलीच्या बालचमूनी गट क्र. १ मध्ये तृतीय क्रमांक मिळवला तर इयत्ता ७ वी. च्या विद्यार्थ्यांनी नाट्यीकरण स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.
समितीचे सर्व विदयार्थ्याचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल बंडोबा असवले व उपाध्यक्ष राजश्री शंकर धामणकर यांनी अभिनंदन केले व पुढील तालुका पातळीवरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!