इंग्रजी अध्ययन समृद्धी बीटस्तरीय स्पर्धेत माळेगांव शाळेचे सुयश
वडगाव मावळ:
पुणे जिल्हा परिषदेच्या दहा कलमी कार्यक्रमांतर्गत वडेश्वर येथे झालेल्या इंग्रजी अध्ययन समृद्धी खडकाळा बीटस्तरीय स्पर्धेत आंदर मावळातील अतिदुर्गम माळेगांव शाळेने सुयश संपादन केले.शाळेतील कु.माहेश्वरी पिंपरकर या विद्यार्थीने एस्से रायटींग स्पर्धेत तर कु.गौरी घोडे हिने स्पीच कॉम्पिटेशनमध्ये द्वितीय क्रमांक संपादीत केला.
बक्षीस वितरण समारंभास विस्तार अधिकारी कृष्णा भांगरे,सुनिल माकर,रघूनाथ मोरमारे,सुहास धस,गुरुनाथ गायकवाड,निलीमा कुलकर्णी,गंगाराम केदार, सिताराम घोडके इ.मान्यवर उपस्थित होते.कॉन्वरसेशन स्पर्धेत सांघिक गटात माहेश्वरी पिंपरकर,शंतनू कांबळे,अस्मिता कोकाटे,युवराज खांडभोर,श्रद्धा गभाले यांनी द्वितीय क्रमांक मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
माळेगांव शाळा ही उपक्रमशील शाळा असून विविध स्पर्धांमध्ये नेहमीच यश संपादित करत असते.
माळेगांव केंद्राचे केंद्रप्रमुख सुनिल माकर,मुख्याध्यापक मधुकर गंभीरे,शितल दंडवते,शिवकांता गिते,प्रविण वैद्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे माळेगांव परिसरात सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!