
पाटण येथील डोंगराला लागलेल्या वणव्यात आदिवासी कुटुंबाची झोपडी जळून खाक.
वडगाव मावळ:
पाटण येथे एका आदिवासी कुटुंबाच्या झोपडीला आग लागून झोपडी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. परिसरात वनवा लागल्याने ही आग पसरत येत झोपडी जळून राख झाली आहे. यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी हे उघड्यावर आलेल्या आदिवासी कुटुंबांच्या तोंडाचा घास हरवला आहे.हे सगळे बांधव मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
लक्ष्मण सोनू वाघमारे असे झोपड़ी जळून खाक झालेल्या आदिवासी बांधवांचे नाव आहे.लक्ष्मण वाघमारे व त्याचा परिवार बुधवारी सकाळी कामासाठी घराबाहेर पडले. दुपारच्या वेळी अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण झोपडी जळून खाक झाली आहे. झोपडीतील भांडी, कपडे, अन्न धान्य तसेच त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड ही सर्व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याने हे ज आदिवासी वाघमारे कुटुंब उध्वस्त होऊन रस्त्यावर आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच मळवली पाटण गावचे कोतवाल सुभाष साठे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच शासनाच्या माध्यमातून आमदारांनी या कुटुंबाला मदत मिळून द्यावी अशी मागणी पाटण ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप
- सफर 361 किल्लांची ग्रुपकडून ढाक गडावर स्वछता मोहीम
पाण्याच्या टाकीला मारले जाळे स्वछता राखण्याचे केले आवाहन - भराव खचल्याने ढंपर उलटल्याची घटना
- साते येथील कंपनीत अडकलेल्या भेकरास वन्यजीवरक्षक संस्थेकडून जीवदान
- सावित्रीच्या लेकीची पायपीट थांबविण्यासाठी करंजगावात सायकल वाटप



