वडगाव मावळ :
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या मावळ शाखेच्या वतीने नविन पेन्शन योजना रद्द करा,इतर आर्थिक व सेवाविषयक प्रश्न तत्काळ सोडवा यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २३ आणि २४ फेब्रुवारी २०२२ला संपाचे हत्यार उपसले आहे.
नविन पेन्शन योजना (NPS) रद्द करून सर्वांना जुनी योजना लागु करा तसेच मध्यंतरीच्या काळात केंद्रीय (NPS) कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या सर्व सुविधा तत्काळ राज्यात लागू करा.
किमान पेन्शन मध्ये केंद्रासमान उच्चीत वाढ करा.
सर्वांना समान किमान वेतन देऊन, कंत्राटी व योजना कामगार (आंगणवाडी, आशा वर्कर्स, महिला परिचर यांच्या सेवा नियमित करा.
शासकीय विभागात कोणत्याही स्वरूपात खाजगीकरण/ कंत्राटीकरणास सक्तविरोध राहील.
सर्व रिक्त पदे तत्काळ भरा. आरोग्य विभागास अग्रक्रम द्या.
सर्व भत्ते केंद्रासमोर द्या. वाहतुक, शैक्षिणिक भत्ता व इतर भत्तेअनुकंपा तत्त्वावरील नियुक्त बिनाशर्त करा तसेच कोरोना काळात वयाधिक झालेल्याकर्मचाऱ्यांना विहित वय मर्यादित सुट द्या.अनुकंपा तत्वावरील नियुक्त बिनाशर्त करा तसेच कोरोना काळात वयाधिक झालेल्या कर्मचाऱ्यांना विहित वय मर्यादित सुट द्या.
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्या मंजुर करा.
शिक्षक-शिणकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न (सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना१०:२०:३०: वर्षे करा. निवृत्तीचे वय ६० वर्षे करा.नवीन शिक्षण धोरण रद्द करा.
किंमती कमी करण्यासाठी पेट्रोलियक पदार्थावरील केंद्रीय कर कमी करा. आणि इतर १४ महत्वाच्या मागण्यांसाठी दि. २३,२४ फेब्रुवारी २०२२ रोजी दोन दिवस ग्रामसेवक संपावर गेले आहेत.
संघटनेचे अध्यक्ष सतिश कालेकर, उपाध्यक्ष रविंद्र वाडेकर , गोपिनाथ खोमणे,बालाजी सुरवसे,,अमोल कोळी,
,राजेंद्र वाघमारे,मोहिनी दौड़कर,कैलास कोळी,शरद ढोले,
माधुरी झेंडे सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संप पुकारला आहे.

error: Content is protected !!