निगडे:
निगडे येथील पाणी पुरवठा योजनेसाठी ९२ लाख रूपयांचा निधी जल जीवन मिशन योजनेतंर्गत मंजूर करण्यात आला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून हा निधी उपलब्ध झाला आहे. भविष्याचा विचार करून राबविली जाणारी ही योजना आमच्या गावक-यांना अधिक उपयुक्त ठरेल असा विश्वास निगडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता भांगरे यांनी व्यक्त केला.
सध्याआमच्या गावासह वाड्या वस्त्यांवर पाणी पुरवठा नियमितपणे सुरू आहे. यासाठी यापूर्वीच्या सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला. त्याला अनुसरून गावात पाणी पुरवठा योजना राबवल्या आहे.त्या वेळी आवश्यक असलेल्या प्रमाणात गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत होते.
आता परिस्थिती बदलली आहे,गावाचे नागरीकरण होऊ लागले .गाव आणि वाड्या वस्त्यांचा विस्तार होऊ लागला आहे.गावची घरे वाढली,त्या प्रमाणात पाणी पुरवठा गरजेचा होणार आहे. ही दूरदृष्टी बाळगून इतका मोठा निधी मंजूर झाला असून लवकरच हे काम प्रगतीपथावर असेल असा विश्वास सरपंच भांगरे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!