अतिदुर्गम खांडी केंद्रातील इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धा उत्साहात संपन्न
टाकवे बुद्रुक:
पुणे जिल्हा परिषदेच्या दहा कलमी कार्यक्रमांतर्गत अतिदुर्गम खांडी केंद्रातील ‘इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धा’ उत्हासात संपन्न झाली.यावेळी खांडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.गंगाराम केदार,मुख्याध्यापक श्री.सुनिल साबळे,श्री.खंडू शिंदे,श्री.विनायक पारखे,श्रीम.संगिता दाते इ.मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत बोरीवलीपासून ते निळशीपर्यंतच्या सर्व शाळांनी सहभाग नोंदवला.इंग्रजी स्टोरी टेलिंग,WH प्रश्न,स्पेलिंग पाठांतर,पोएम सिंगींग,निबंधलेखन,सुलेखन,संभाषण,नाट्यीकरण इ.स्पर्धा घेण्यात आल्या.स्पर्धेमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होवून गुणवत्ता वाढीस वाव मिळतो,असे मत केंद्रप्रमुख श्री.गंगाराम केदार यांनी व्यक्त केले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री.रामेश्वर बागडे व श्री.सुशिल कांबळे यांनी काम पाहिले.कोरोनाकाळानंतर शाळा सुरु झाल्यानंतर ही पहिलीच स्पर्धा असल्याने या स्पर्धेत मुले उत्साहाने सहभागी झाली होती.
यावेळी प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले.प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी बीट स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरली असल्याने त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.उमेश माळी यांनी तर आभार श्री.राजू वाडेकर यांनी मानले.स्पर्धेचे यशस्वी संयोजन श्रीम.रुपाली गायकवाड,श्री.शिवाजी चौगुले व श्री.राहूल राठोड यांनी केले.यशस्वी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!