आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची २१० वी जयंती निमित्त तालुक्यात पत्रकार कार्यशाळा

तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्या वतीने आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची २१० वी जयंती तालुक्यातील पत्रकार यांची कार्यशाळा घेऊन साजरी करण्यात आली.
या कार्यशाळेच्या उदघाटनाच्या अध्यक्षस्थानी मा.राज्यमंत्री संजय (बाळा)भेगडे होते. तर आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली समर्पित करून आमदार सुनिल शेळके यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ.एस.के.कुलकर्णी,डॉ.प्रा.संजय तांबट, ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे हे व्यासपीठावर होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, मावळ तालुका भाजपचे अध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी नगरसेवक गणेश खांडगे, यादवेंद्र खळदे, वैशाली दाभाडे, अरुण भेगडे पाटील, भाजपा शहराध्यक्ष रविंद्र माने, सुहास गरुड, श्रीकृष्ण पुरंदरे, संदीप पानसरे, डॉ. सत्यजित खांडगे तसेच तालुक्यातील सर्व भागातील पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले की तालुक्यातील पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. तसेच माजी मंत्री संजय भेगडे म्हणाले की, पत्रकारांनी तळागाळातील सर्व स्तरावरील प्रश्नाची मांडणी करून ते जनतेच्या समस्या शासनासमोर मांडाव्यात. जेणेकरून समाजाचा फायदा होईल.
यावेळी कार्यशाळेतील पत्रकारांना मार्गदर्शन करताना समाजाला सुदृढ करणाऱ्या बातम्या शोधून पत्रकारांनी समाज जागृती करावी. असे तांबट यांनी मत व्यक्त केले. तसेच एस के कुलकर्णी म्हणाले पत्रकारिता काल,आज व उद्याची ही अभ्यासपूर्वक असावी, नवीन आधुनिक साधनाचा वापर व्यवस्थित करावा, त्याचे तंत्रज्ञान समजून घ्यावे. हे सांगताना दोन्ही व्याख्यात्यांनी उदाहरणे देखील दिली.
या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष मनोहर दाभाडे ,प्रास्ताविक संस्थापक सुरेश साखळकर, आभार सचिव सोनबा गोपाळे गुरुजी,तर सूत्रसंचालन अतुल पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील वाळुंज, बी,एम,भसे,तात्यासाहेब धांडे, प्रभाकर तुमकर,श्रीकांत चेपे, मच्छिंद्र बारवकर यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार रमेश जाधव गुरुजी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
- कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्ट व महावीर हाॅस्पिटलच्या वतीने
श्री.संत भगवान बाबा ज्ञानेश्वरी प्रासादिक दिंडी साठी मोफत पाणी टँकरची सुविधा - शिंदेघाटेवाडीत वृक्षारोपण तरूणांचा पुढाकार,ज्येष्ठांचे मार्गदर्शन
- टाकवे बुद्रुकला मोफत प्राणायाम शिबीर
- कै कृष्णाजी काजळे प्रतिष्ठानच्या वतीने वारक-यांसाठी मोफत पाणी पुरवठा
- मावळातील १० शाळांना २५ लाख रुपयांचे क्रिडा साहित्य उपलब्ध



