कल्हाट:
जि.प.प्राथ.शाळा कल्हाट येथे शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या वेळी बाळासाहेब तोडकरयांच्या हस्ते श्री शिव प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान
कृष्णा भांगरे विस्तार अधिकारी खडकाळा बीट यांनी भूषविले.
प्रमुख पाहुणे संदीप तोडकर,प्रकाश माहातो शिव ट्रेडिंग अकॅडमी संस्थापक कृष्णा मोरे जीवनविद्या मिशन चे मा.ता. अध्यक्ष हे होते. शिवजयंतीचे औचित्य साधून शिव ट्रेडिंग अकॅडमी शेअर मार्केटिंग चिखली पुणे यांजकडून द्वितिय वर्धापन दिनानिमित्त 2000 ली पाण्याची टाकी व 1 HP जलविद्युत पंप शाळेस देण्यात आला. यावेळी भांगरे साहेबांनी सहकार्यातून विकास कसा साधला जातो हे सांगून परिसरातील शाळांना मदत करण्याचे आवाहन केले.
मुलांची भाषणे झाली. सांस्कृतिक कार्यक्रम व खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी केदार केंद्रप्रमुख खांडी, संभाजी करवंदे शा.व्य.स.अध्यक्ष व सर्व सदस्य, नवनाथ कल्हाटकर , लक्ष्मण देशमुख , कट्टे मुख्या.कल्हाट गावठाण शाळा व गुळवे मुख्या.करवंदेवस्ती शाळा व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते .प्रस्ताविक उमेश विश्वासराव यांनी केले. सुत्रसंचालन बळिराम वाघमारे यांनी केले. आभार सुमित नळे यांनी मानले.

error: Content is protected !!