वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील तीस गावाच्या पाणी पुरवठा योजनांसाठी ३२ कोटी १९ लक्ष रुपयांच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून या ३० गावच्या नळ पाणी पुरवठा योजनांना दुसऱ्या टप्प्यात प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली.
मावळ तालुक्यातील भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरून घराघरात नळ द्वारे पाणी पुरवठा योजना राबवू असे आश्वासन मावळचे आमदार शेळके यांनी मावळच्या जनतेला दिला विधानसभा निवडणुकीत दिला होता.
याच अनुषंगानेच मावळात पाणी पुरवठा योजना राबविण्यावर आमदार शेळके यांचा भर आहे.
दुसऱ्या टप्प्यातनिगडे,बेडसे,सांगवी,वरसोली,पांगळोली,कल्हाट,मुंढावरे,शिरे,खांडशी,पाचाणे,कशाळ,किवळे,मळवंडी ढोरे,थुगाव,वारू,वळक,वडीवळे,नवलाख उंबरे,बधलवाडी,जाधववाडी,मिंडेवाडी,नागाथली,कडधे,धामणे,आंबेगाव,आढले खुर्द सह अन्य गावात पाणी पुरवठा योजना राबवल्या जाणार आहे.
नवलाखउंब्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच चैताली कोयते म्हणाले,” आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून आमच्या गावात ५ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याचे आम्ही स्वागत करतो. या निधी मुळे गावात विस्तारीत पाणी पुरवठा योजना राबविण्यात येईल. महिला म्हणून मी या बद्दल आमदार साहेबांचे आभार मानते.

error: Content is protected !!