
अहमदनगर:
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. महसूलमंत्री थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त ही भजन स्पर्धा घुलेवाडी येथे आयोजित करण्यात आली होती .
त्यानिमित्ताने राज्याच्या विविध भागातून संघांनी आपला सहभाग घेतला होता.औरंगाबाद ,कोपरगाव, येवला, वैजापूर, अकोला, पुणे, मावळ, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, नागपूर या विभागातून भजन स्पर्धेसाठी संघ होते.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्तेदीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. लहान गटामध्ये प्रथम पारितोषिक अगस्ती क्लासेस अकोले, व संदीपनी गुरुकुल संगमनेर, द्वितीय क्रमांक गणेश बाल भजनी मंडळ फुरसुंगी व दीनानाथ भजनी मंडळ मुखेड,
तृतीय क्रमांक कोल्हाळेश्वर भजनी मंडळ कोल्हार यांनी पटकावले.
मोठे गटामध्ये प्रथम क्रमांक माऊली भजनी मंडळ पेठ वडगाव ,कोल्हापूर व स्वरगंध भजनी मंडळ हडपसर,
द्वितीय क्रमांक शिवाजी महाविद्यालय औरंगाबाद व संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ शेटेवाडी तळेगाव दाभाडे,
तृतीय क्रमांक हनुमान भजनी मंडळ मांडवे व श्रुती भजनी मंडळ राहुरी, चतुर्थ क्रमांक दीनानाथ भजनी मंडळ व संदीपनी गुरुकुल संगमनेर पाचवे व उत्तेजनार्थ मुक्ता देवी भजनी मंडळ जुन्नर व नमो शारदा भजनी मंडळ पुणे यांना मिळाले.
निवृत्ती भोसले, योगेश भालेराव, नवनाथ अरगडे, विवेक पानसरे, शिवाजी दुशिंग सर, खंडू अण्णा सातपुते दत्तात्रय चिमण राऊत, राजश्रीताई वाघचौरे, संतोष लक्ष्मण राऊत, प्रविण सोनवणे, सुनील भाऊसाहेब राऊत, प्रकाश पारखे सर, सुनील रोकडे ,राजू आव्हाड, रमेश नागरे, दीपक पानसरे, संजय ढमाले सहकार्य केले.
स्पर्धेचे आयोजन रोहिदास महाराज बर्गे, राजू खरात ,रवींद्र गिरी, राहुल वर्पे, विजय गुंजाळ, चंद्रकांत वाघचौरे, चंद्रकांत शिरसागर स्पर्धेच्या निमित्ताने आलेल्या सर्व संघांचे सिताराम राऊत मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांनी प्रास्ताविक केले.
- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप
- सफर 361 किल्लांची ग्रुपकडून ढाक गडावर स्वछता मोहीम
पाण्याच्या टाकीला मारले जाळे स्वछता राखण्याचे केले आवाहन - भराव खचल्याने ढंपर उलटल्याची घटना
- साते येथील कंपनीत अडकलेल्या भेकरास वन्यजीवरक्षक संस्थेकडून जीवदान
- सावित्रीच्या लेकीची पायपीट थांबविण्यासाठी करंजगावात सायकल वाटप



