
बेशिस्त ऊस ट्रॉली तळेगाव हद्दीत बंद करा अन्यथा आंदोलन करणार : किशोर आवारे
तळेगाव स्टेशन:
बेशिस्त ऊस ट्रॉली ची वाहतूक तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत बंद ठेवण्यात यावी अशी मागणी जनसेवा विकास समितीचे सर्वेसर्वा व जनसेवा विकास प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी केली.
या बाबतचे लेखी पत्र सचिव मिलिंद अच्युत यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन व तळेगाव दाभाडे वाहतूक शाखा यांना दिले आहे. बेशिस्त दुहेरी ऊस ट्रॉली मुळे अनेक नागरिकांचा बळी गेला आहे.अनेक नागरिक अपघात ग्रस्त झाले आहेत.
बेशिस्त ऊस ट्रॉलीची वाहतुक सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत करण्यात यावी अन्यथा जनसेवा विकास समिती रविवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी तळेगाव स्टेशन मराठा क्रांती चौक येथे आंदोलन करणार आहे.
नियमीत शाळा व क्लासेस सुरू झाल्याने महिलाभगिनी वर्ग मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने चालवीत आहेत. बेशिस्त ऊस ट्रॉली मुळे अपघात होण्याचा धोका अधिक वाढला असल्याने संभाव्य अपघात व त्यातून होणारी जीवित हानी रोखण्यासाठी ऊस ट्रॉली ची वाहतूक तळेगाव शहरात बंद ठेवण्यात यावी असे किशोर आवारे यांनी नमूद केले.
- कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्ट व महावीर हाॅस्पिटलच्या वतीने
श्री.संत भगवान बाबा ज्ञानेश्वरी प्रासादिक दिंडी साठी मोफत पाणी टँकरची सुविधा - शिंदेघाटेवाडीत वृक्षारोपण तरूणांचा पुढाकार,ज्येष्ठांचे मार्गदर्शन
- टाकवे बुद्रुकला मोफत प्राणायाम शिबीर
- कै कृष्णाजी काजळे प्रतिष्ठानच्या वतीने वारक-यांसाठी मोफत पाणी पुरवठा
- मावळातील १० शाळांना २५ लाख रुपयांचे क्रिडा साहित्य उपलब्ध



