कामशेत:
मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त कामशेत येथील डाॅ.विकेश मुथा यांच्या महावीर हॉस्पिट च्या वतीने प्रथम नोंदणी करणा-या ५१ रूग्णांच्या शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे,संबंधित रूग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांनी केले आहे.
मूळव्याध,हर्निया,अॅपेन्डिस,मूतखडा,पित्तशयाचे खड्डे,हाडांच्या शस्त्रक्रिया, अंगावरील गाठ,गर्भाशयाची पिशवीची व्याधी,पोटाचा घेर,वाढलेले वजन अशा अनेक शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करता येणार आहे.
सर्वसामान्य रुग्णांसाठी आपले वाटणारे महावीर हाॅस्पिटल कायमचे रुग्णसेवेवर कटिबद्ध आहे.
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करणारे कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्टचे सर्वेसर्वा डाॅ. विकेश मुथा विविध उपक्रमांतून रूग्णसेवा करीत आहे.
महावीर हॉस्पिटलच्या वर्धापनदिनानिमित्त मूळव्याध,हर्निया,मूतखडा,पित्तशयाचे खड्डे,हाडांच्या शस्त्रक्रिया,अंगावरील गाठ,व्रण,गर्भाशयाची पिशवी,पोटाचा घेर या शस्त्रक्रिया सवलतीत करता येणार आहे.
प्रथम नोंदणी करणा-या ५१ रूग्णांना ही सवलत देण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी ९८२२४०३४२२ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. या बाबतीत अधिक आपल्याला महावीर हाॅस्पिटल मध्ये घेता येईल. आतापर्यंत शेकडो रूग्णांनी या व्याधीवर उपचार घेऊन आनंदात जगत आहेत.
रोजच्या व्याधींनी त्रस्त झालेल्या रूग्णांच्या दु:खावर फुंकर मारण्यासाठी महावीरने ही योजना आणली आहे.

error: Content is protected !!