पुणे जिल्हा सहकारी दूध संघाची निवडणूक जाहीर
पुणे :
सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक २० मार्च रोजी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवार, १४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्र सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद सोबले यांची नियुक्ती केली आहे. सोबले यांनी सहकारी निवडणूक प्राधिकरणाला सादर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी दिल्याचे पत्र प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिले आहे.
संघाच्या संचालकपदाच्या १६ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर आणि दौंड या अकरा तालुक्यांसाठी दूध उत्पादक सोसायटी यांचा प्रत्येकी एका गटातून एक संचालक महिला संचालकांसाठी अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती आणि इतर मागास वर्गासाठी प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होईल.
•उमेदवारी अर्ज दाखल: १४ ते १८ फेब्रुवारी
•उमेदवारी अर्जाची छाननी : २१ फेब्रुवारी
• वैध उमेदवारांची यादी जाहीर करणे २२ फेब्रुवारी
•उमेदवारी अर्ज मागे घेणे : २२ फेब्रुवारी ते ८ मार्च
• चिन्ह वाटप ९ मार्च
• मतदान: २० मार्च सकाळी ९ ते सायंकाळी ५
• मतमोजणी : २१ मार्च

error: Content is protected !!