
देर है पर अंधेर नही !
मुंबई:
मागिल मुंबई महानगर पालिका निवडणुक वचननाम्यात शिवसेनेने “डबेवाला भवन “ चे आश्वासन डबेवाल्यांना दिले होते. परंतु डबेवाला भवनसाठी मुंबई महानगर पालिके कडून जागा उपलब्द होत नव्हती म्हणुन डबेवाला भवनचा प्रश्न काही पुढे सरकत नव्हता तो बरेच दिवस प्रलंबित राहीला होता.
आता पुन्हा मुंबई महानगर पालिकेच्या निवडनुका आल्या होत्या या पाश्वभुमीवर “ मुंबई डबेवाला असोशिएशन” ने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व मुंबईच्या महापौर यांचेशी पत्र व्यव्हार केला आणी त्यांना डबेवाला भवनच्या जागेचा प्रश्न जातीने लक्ष घालून सोडवण्याची विनंती केली होती.
त्या विनंती नुसार मुंबई महानगर पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आज मुंबई महानगर पालिका सभागृहात भाषण करताना सांगितले की डबेवाला भवनसाठी वांद्रे एच विभागात २८६.२७ चौ.मी.जागा उपलब्द करून देत आहोत.
डबेवाला भवनच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आता त्या जागेवर भव्यदिव्य असे डबेवाला भवन लवकरच उभे राहील. डबेवाला भवनसाठी जागा उपलब्द करून दिल्या बद्दल आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे आभारी आहोत.
या निर्णया मुळे शिवसेनेकडे देर आहे पण अंधेर नाही श्रध्दा आणी सबुरी ठेवली तर शिवसेना डबेवील्यांचे सर्व प्रश्न नक्कीच सोडवील असा विश्वास सुभाष तळेकर
अध्यक्ष मुंबई डबेवाला असोशिएशन यांनी व्यक्त केला.
- कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्ट व महावीर हाॅस्पिटलच्या वतीने
श्री.संत भगवान बाबा ज्ञानेश्वरी प्रासादिक दिंडी साठी मोफत पाणी टँकरची सुविधा - शिंदेघाटेवाडीत वृक्षारोपण तरूणांचा पुढाकार,ज्येष्ठांचे मार्गदर्शन
- टाकवे बुद्रुकला मोफत प्राणायाम शिबीर
- कै कृष्णाजी काजळे प्रतिष्ठानच्या वतीने वारक-यांसाठी मोफत पाणी पुरवठा
- मावळातील १० शाळांना २५ लाख रुपयांचे क्रिडा साहित्य उपलब्ध



