टाकवे बुद्रुक:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजगाव पठार,(डोंगरवाडी)येथे इनरव्हील क्लब पुणे रिव्हर साईड यांच्या सौजन्याने शालेय प्रवेशद्वार,वॉल कंपाऊंड रंगरंगोटी, तसेच विद्यार्थी पूरक साहित्य आणि खेळणी इत्यादी पूर्णत्वास झालेल्या कामाचे उद्घाटन क्लबच्या मान्यवर सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष निर्मला मित्तल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. डिस्ट्रिक एडिटर डॉक्टर दीपशिखा मॅडम आणि माजी अध्यक्ष नीना नरेडी क्लबचे इतर सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी नीना नरेडी यांनी या गावात दुर्गम भागात आदिवासी वस्तीवर राहणारी गरीब कुटुंब आहेत आणि अशा कुटुंबातील मुलांना योग्य शालेय वातावरण मिळावं त्यांच्या शालेय उपस्थितीत वाढ व्हावी तसेच शालेय गुणवत्तेत भर पडावी या उद्देशाने या सर्व कार्यक्रमासाठी शाळेला सहकार्य करण्यात आले. याचा निश्चित शाळेला तसेच गावाच्या विकासाला हातभार लागेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्ष निर्मला मित्तल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर, वाचन समृद्धी तसेच इंग्रजी वाचन,लेखन व संभाषण इत्यादी गुणवत्ता वाढीसाठी शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे नियोजन करण्याचे निश्चित केले आहे याचा शाळेस तसेच गावाच्या विकासासाठी निश्चित उपयोग होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास मेमाणे तसेच सदस्य अरुण मेमाणे, रंजीत खाडे, रामदास खाडे,मारुती हिले तसेच सेवावर्धिनी संस्थेचे मुख्य प्रवर्तक माणिक गवळी आणि अंगणवाडी कार्यकर्ता कविता मोरमारे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मल्लिकार्जुन कांबळे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे स्वागत आणि आभार अलका निमसे यांनी मानले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊवाटप करण्यात आला.

error: Content is protected !!