सांगाती सह्याद्रीचे’ ग्रुपच्या अध्यक्षपदी सुनिल साबळे यांची निवड
वडगांव मावळ:
येथे झालेल्या बैठकीत ‘सांगाती सह्याद्रीचे’ शिक्षक मित्र परिवार ग्रुपच्या अध्यक्षपदी खांडी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल साबळे यांची तर सचिवपदी राहूल जाधव यांची निवड करण्यात आली.
या ग्रुपच्या माध्यमातून गड-किल्ल्यांवर ट्रेक करुन ऐतिहासिक माहिती गोळा करणे व ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे तसेच दुर्गम आदिवासी भागात मदत करणे इ.उपक्रम राबवले जातात.निसर्ग चक्रीवादळ काळात राजमाची येथे,कोरोनाकाळात कळकराई येथे व महापूर काळात सांगली-कोल्हापूर येथे या ग्रुपच्या माध्यमातून मदत करण्यात आलेली आहे.
ग्रुपच्या कार्यवाहपदी भरत शेटे यांची तर उपक्रम प्रमुखपदी अंकूश मोरमारे यांची निवड करण्यात आली.
नजीकच्या काळात पुन्हा राजमाची येथे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे ग्रुपचे सदस्य मा.गटविकास अधिकारी निलेश काळे,राजू भेगडे,अनिल कळसकर , रघूनाथ मोरमारे,,सुभाष भानुसघरे,तानाजी शिंदे,सोपान असवले,मुकुंद तनपुरे यांनी सांगितले.
मावळातील सर्व गडांवर स्वच्छता मोहिम राबवण्याचा ग्रुपचा विचार असल्याचे मत ग्रुपचे सदस्य संदिप औटी,मनोज भांगरे,गोकूळ लोंढे,प्रमोद भोईर व ज्ञानेश्वर शिवणेकर यांनी व्यक्त केले.सांगाती सह्याद्रीचे ग्रुपच्या नविन कार्यकारणी निवडीबद्दल ग्रुपचे सदस्य दिपक मेमाणे,उमेश माळी,अनिकेत रासकर,अजिनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!