नाणे मावळातील कातकरी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप
करंजगाव::
आमदार सुनिल शेळके यांच्या सहकाऱ्यांनी नाणे मावळ मधील करंजगाव ब्राह्मणवाडी येथील कातकरी बांधवांना शनिवारी (दि.५) दाखल्यांचे वाटप केले. कातकरी बांधवांच्या विकासासाठी अनेक उपक्रम आमदार सुनिल शेळके यांनी राबविले आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ राबवून त्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडीवस्तीवरील कातकरी बांधवांच्या घरापर्यंत पोहोचून जातीच्या दाखल्यांचे अर्ज भरून घेतले.व पुढील प्रक्रिया पूर्ण करून जातीचे दाखले काढून दिले आहेत.
दाखल्यांसाठी कागदपत्रांची पूर्तता करताना कातकरी बांधवांना शासकीय कार्यालयात अनेक खेटा घालाव्या लागत असल्याने त्यांचा वेळही वाया जातो.आमदार शेळके यांनी यासाठी योग्य नियोजन केल्यामुळे अल्पावधीत जातीचे दाखले उपलब्ध झाले आहेत,असे मत करंजगावचे उपसरपंच नवनाथ ठाकर यांनी मांडले.
संपूर्ण मावळ तालुक्यात
आमदार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी कातकरी वस्त्यांवर जाऊन कातकरी बांधवांना जातीचे दाखले देत आहेत. कातकरी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत परंतु जातीचा दाखला नसल्यामुळे त्या योजनांचा लाभ मिळवण्यात अडचणी येत होत्या, परंतु आता जातीचा दाखला उपलब्ध झाला झाल्याने कातकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. शनिवार (दि.५) करंजगाव येथील ८३ कातकरी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. जातीचे दाखले मिळवून दिल्याबद्दल कातकरी बांधवांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले आहेत.
यावेळी करंजगावचे उपसरपंच नवनाथ ठाकर, सदस्य महादेव शेडगे,उज्वला पोटफोडे, वैशाली कुटे, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब मोरमारे, इंदाराम उंडे, काळूराम भालशिंगे, किसन गाडे, प्रसाद टाकवे, सुरेश वाघमारे, तुकाराम कशाळे, आमदार सुनिल शेळके यांचे सहकारी सचिन वामन,रुपेश सोनुने, नबीलाल आत्तार, हर्षद साबळे, सोमनाथ आंद्रे,शेखर कटके आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!