पिंपरी:
मावळ लोकसभेचे माजी खासदार गजानन धरमशी बाबर (वय ७९) यांचे निधन झाले. सातारा जिल्ह्यातील बाबर पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झाले होते.
शिवसेनेच्या चिन्हावर ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तीन वेळा नगरसेवक झाले होते. विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. हवेली विधानसभा मतदार संघाचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले. मावळ लोकसभा मतदार संघातून ते संसदेमध्ये निवडून गेले.
राजकीय कारकिर्द लाभलेले बाबर मागील काही दिवसांपासून आजारी होते. एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दोन दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बंधू माजी नगरसेवक प्रकाश बाबर, मधुकर बाबर, तीन बहिनी, सुना, नातवंडं असा परिवार आहे.

error: Content is protected !!