
पुरंदर:
पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे यांचा वाढदिवस जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस श्रीकांत ताम्हाणे व तालुका सरचिटणीस श्रीकांत थिटे अनाथांची माय असलेल्या वै. सिंधुताई सपकाळ यांच्या कुंभारवळण ता.पुरंदर येथील ममता बाल सदन या आश्रमात येथील विद्यार्थ्यांना समवेत साजरा केला. आश्रमातील विद्यार्थ्यांना शिधा व खाऊ वाटप करण्यात आला.भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
ममता बाल सदन या संस्थेस श्रीकांत थिटे यांनी देणगीही दिली. पश्चिम महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, संस्थेचे सचिव दीपक गायकवाड, तालुक्याचे कार्याध्यक्ष निलेश जगताप, बाळासाहेब भोसले, सुरेंद्र जेधे, हनुमंत साळुंखे गणेश भोसले, नदीम इनामदार, दीपक जावळे, प्रमोद तावरे पाटील व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
- पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज देणार :- माऊली दाभाडे
- महिंद्रा कंपनी परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे आंदर मावळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
- गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
- बेलज येथे मदुरा मायक्रोफायनान्स लिमिटेड’ आणि ‘क्रेडिटऍक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाड्यांसाठी आवश्यक साहित्य वितरण
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर







