मावळमित्र न्यूज विशेष:
सुके खोबरे आरोग्याच्या अनेक तक्रारींवर लाभदायक आहे. कच्च्या खोबऱ्याचा तुकडा खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होत असल्याचे एका संशोधनातून निष्पन्न झाले आहे.
शरीरात वाढलेले अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी आहारात खोबऱ्याच वापर फायदेशीर ठरतो. झोपण्यापूर्वी कच्चे खोबरे खाल्याने खोबऱ्यातील फायबर शरीरात अतिरिक्त वाढलेले फॅट (चरबी) बर्न व्हायला मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी खोबऱ्याचा एक छोटा तुकडा खाल्ल्याने ह्रदयाचे आरोग्य सुधारते. चांगले कोलेस्ट्रॉल शरीराला मिळतात. खोबरेल तेलाच्या सेवनाने पोटावरची अतिरिक्त चरबी कमी व्हायला लागते. पोट कमी झाल्याने ह्रदय निरोगी राहतं आणि मधुमेहाचा धोका टाळता येतो.
हल्ली तणावग्रस्त जीवनशैलीचा परिणाम झोपेवर होऊन झोप अपुरी होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी सुकलेल्या खोबऱ्याचा एक तुकडा खाऊन झोपा. दररोज हा उपाय केल्याने शांत झोप लागते.
कच्चे खोबरे खाणे हा नैसर्गिक उपाय असून यामुळे बद्धकोष्ठता कमी व्हायला मदत होते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे आणि सकाळी पोट साफ होत नाही. त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या खोबऱ्याचा तुकडा खावा. नारळातील फायबर बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.
शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे आजार होऊ शकतात. अशावेळी कच्चे खोबरे खाल्ल्याने फायदा होतो. यामुळे एनिमियासारखे आजार होत नाहीत. कच्च्यात खोबऱ्यात आयर्नचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी या खोबऱ्याचा फक्त एक तुकडा खाल्ल्याने एनिमियासारख्या आजारांपासून सुटका होते.
नारळातील अनेक आरोग्यदायी गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढतेच तसेच स्मरणशक्ती वाढायलाही मदत होते. गर्भवती आणि बाळंत झालेल्या महिलांना याचा फायदा जास्त होतो.
खोबरं एक चांगलं अँण्टीबायोटिक आहे. यामुळे वेगवेगळ्या अॅलर्जीपासून संरक्षण होते. खोबरेल तेल हे एक उत्तम सनस्क्रीनही आहे, यामुळे उन्हात जाण्याआधी खोबरेल तेलही त्वचेला लावतात. यामुळे त्वचा चमकदार होते.पोटात जंत झाल्यास रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या खोबऱ्याचा तुकडा खावा. आराम मिळतो असे बहुपयोगी खोब-याचा आहारात समावेश करावा असे तज्ञ आवर्जून सांगत आहेत.

error: Content is protected !!