
पवना शिक्षण संकुलात आदिवासी विद्यार्थी व आदिवासी जात प्रमाणपत्र शिबीर संपन्न, शिबिरात परिसरातील ३५० लाभार्थींना घेतला लाभ
पवनानगर:
पवनमावळ परिसरातील आदिवासी विद्यार्थी व आदिवासी जात प्रमाणपत्र शिबीर संपन्न झाले या शिबिरात ३५० लाभार्थींनी सहभाग नोंदविला होता
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे व पवना शाळेच्या प्राचार्या अंजली दौंडे यांच्या विशेष प्रयत्नातून ह्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या घोडेगाव शिबीरात वरीष्ठ आदिवासी विकास निरीक्षक प्रमुख चव्हाण, प्राध्यापक दादासाहेब सितापुरे,कालेचे माजी उपसरपंच प्रविण घरदाळे, शाळेच्या प्राचार्या अंजली दौंडे, पर्यवेक्षिका निला केसकर, बाळासाहेब सातकर, सुजित सातकर,कुंडलिक राऊत, योगेश तुपे आदी उपस्थित होते.
पवना विद्यालयात अदिवाशी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहेत शासनाकडून विद्यार्थ्यांना अनेक शासकीय शिष्यवृत्ती मिळत असते परंतु अजूनही अनेक विद्यार्थी व आदिवासी बांधवाकडे दाखले नसल्याने अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत होते. याबाबत शिबीराचे आयोजन करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला तसेच यासाठी आमदार सुनील शेळके युवा मंच यांनी विशेष परिश्रम घेतले
यावेळी बोलताना प्राचार्या दौंडे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना शासन पातळीवर अनेक शिष्यवृत्ती योजना मिळत असतात परंतु अपुरे कागदपत्रे व दाखले नसल्याने शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहावे लागते शिबीरात दाखले मिळाल्यास त्यांना फायदा होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश ठोंबरे तर आभार राजकुमार वरघडे यांनी मानले.
- पुन्हा एकदा संस्कार प्रतिष्ठान महाराज्यच्या यशात मानाचा तुरा
- कान्हे रेल्वे उड्डाणपुलास ग्रामस्थांचा विरोध
भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन - वरसुबाई विद्यालयात वह्यांचे वाटप
- भारतीय जनता पक्ष उत्तर भारतीय आघाडी तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी जाहीर
- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप







