गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त भरत शेटे यांचा नवलाख उंबरे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
वडगांव मावळ:
पंचायत समिती मावळ सभापती,उपसभापती व सदस्य आयोजित तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल भरत शेटे यांचा नवलाख उंबरे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सभापती निवृत्तीभाऊ शेटे,प्रथम महिला सरपंच सौ.चैताली कोयते,उपसरपंच श्री.राहूल शेटे,युवा उद्योजक श्री.संपत शेटे,श्री.नवनाथ पडवळ,अध्यक्ष श्री.शांताराम शेटे,श्री.मयूर नरवडे,श्री.शत्रुघ्न शेटे,श्री.रामनाथ बधाले,श्री.किरण जाधव,हिरामण बधाले इ.मान्यवर उपस्थित होते.शाळेचा भौतिक व शैक्षणिक विकास साधत विद्यार्थी हीत जोपासल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती.
श्री.भरत शेटे सर हे नवलाख उंबरे गावचे भूषण असून त्यांनी परीटवाडी व बधालेवस्ती येथील शाळांचा कायापालट केलेला आहे असे मत माजी सभापती श्री.निवृत्तीभाऊ शेटे यांनी व्यक्त केले.बधालेवस्ती शाळा ही मावळ तालुक्यातील पहिली आय.एस.ओ वस्तीशाळा असून शाळेचा भौतिक व शैक्षणिक विकास साधण्यात शेटे सरांचे अनमोल योगदान आहे अशी प्रतिक्रिया शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण जाधव यांनी व्यक्त केली..
श्री.भरत शेटे यांना यापूर्वी बधालेवस्ती व्यवस्थापन समिती तसेच शिवसेनेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला असून त्यांच्या या पुरस्कार प्राप्तीबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे.

error: Content is protected !!