वडगाव मावळ:
वडगाव नगरपंचायत वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नगरपंचायत आवारात नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत शहरातील मतदार बांधवांसाठी कर्तव्यनिष्ठेची प्रतिज्ञा घेतली.
आपण भारत देशाचे सुजन नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून तसेच आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करून आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततीपूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पवित्र राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता व कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करू अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर, उपनगराध्यक्ष शारदा ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, राहुल ढोरे, दिलीप म्हाळस्कर, दिनेश ढोरे आणि नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरीक उपस्थित होते.

error: Content is protected !!