लोणावळा :
नांगरगाव शिवसेना शाखेच्या लोणावळा येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
लोनपाच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव ह्यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
लोणावळा शहर शिवसेना शहर प्रमूख बबनराव अनसुरकर यांच्या हस्ते शिवछत्रपतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नेते सुरेश गायकवाड यांंच्या वतीने नागारिकांना प्रसादरुपी अन्नदान करण्यात आले प्रसंगी शिवसेना विभाग प्रमूख उल्हास भांगरे , हिंदूस्थान माथाडी कामगार सेना नांगरगाव विभागीय मारुती जाधव ,उपविभागप्रमूख किशोर भांगरे , युवासेना उपाध्यक्ष विवेक भांगरे , गटप्रमूख बाळासाहेब जाधव , गटप्रमूख अनिल भांगरे , भाजप लोणावळा शहर उपाध्यक्ष सचिन साठे , अर्जून दुर्गे , शिवेसैनिक बाळासाहेब भांगरे , प्रशांत जाधव , आतिष भांगरे , मयूर दळवी , रामदास न्हालवे , अनिल येवले , विजय ढोकळे , प्रतिक जाधव , तुषार भांगरे , जेष्ठ मार्गदर्शक रामभाऊ जाधव , शांताराम भांगरे , शांताराम नाणेकर आणि लोनपा शिक्षण मंडळ माजी उपसभापती प्रदीप थत्ते उपस्थित होते .शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

error: Content is protected !!