मावळमित्र न्यूज विशेष:
राजकारणाचा वसा लाभलेल्या या तरूणाने राजकारणाच्या पलिकडे जाऊन लोकसेवेचा वसा जपला आहे. लोकसेवेचे हे व्रत अखंड पणे तेवत ठेवण्यासाठी त्याने वंचितांच्या साठी काम करण्याचा मानस घेतला आणि तो तडीस नेहण्यासाठी तो राबत आहे. इतरांच्या डोळ्यातील अश्रू तोच पुसू शकतो. ज्याचे मन संवेदनशील आहे. अशाच संवेदनशील मनाचा कार्यकर्ता आपल्या परी राबत आहे. राबणा-या या त्याच्या हाताला यश लाभते याचे आम्हा मित्रांना सार्थ अभिमान आहे.
कान्हेतील किशोर अशोक सातकर असे या तरूण मित्राचे नाव.
वडील अशोक मारुती सातकर यांची नोकरी करून शेती कायमच नाळ जोडलेली. तर आई अश्विनी अशोक सातकर आदर्श गृहिणी.भाऊ चेतन अशोक सातकर आयटी इंजिनिअर. किशोरचे प्राथमिक शिक्षण कान्हेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत. माध्यमिक शिक्षण कान्हे येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिरात झाले. उच्च माध्यमिक शिक्षण आकुर्डी येथे सायन्स विभागातून श्री म्हाळसाकांत ज्युनिअर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण व पदवीचे बीएस्सी शिक्षण प्रा.रामकृष्ण मोरे आर्टस् , कॉमर्स आणि सायन्स कॉलेज आकुर्डी येथे झाले.
अत्यंत सुस्वभावी असलेला किशोरभाऊ कान्हे येथे महिंद्रा स्पेअर्स बिझनेस, टिव्हीएस् सप्लाय चेन सोल्यूशन्स लिमी. कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीला असून चार वर्षे महा.राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन संघटनेचे प्रतिनिधी म्हणून देखील कामकाज सांभाळले आहे. रिअल ईस्टेट जमीन खरेदी-विक्री व्यवसायात कार्यरत.
किशोरचे आजोबा कै.तात्याबा ऊर्फ मारुती मनाजी सातकर हे कान्हे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच तसेच ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचे विश्वस्त होते.
राजकीय पार्श्वभूमी असल्याने त्याला समाजकारणा प्रमाणे राजकारणाची आवड आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस मावळ तालुक्याचे सोशल मिडीया सरचिटणीस, विद्यार्थी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष तसेच युवक राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्ष पदावर संधी मिळाली आहे.
सामाजिक काम करत असताना शारिरीक दृष्ट्या विकलांग विद्यार्थी-विद्यार्थीनींना वाढदिवसाच्या दिवशी खाऊ वाटप, साते येथील जि.प. शाळेमध्ये खाऊ वाटप, वृक्षारोपण कार्यक्रम नियोजन केले.
ग्रामीण भागातील तरुणांना नोकरी मिळवून देण्याचे काम
ग्रामीण भागातील नागरिकांना सोयीसुविधा मिळाव्यात या हेतुने विविध योजनांचा पाठपुरावा करणे यात हा तरूण सहकारी कायमच गुंतलेला असतो .
आज त्याचा वाढदिवस म्हणून हा सगळा लेखन प्रपंच जिवाभावाच्या सहकारी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपसूकच ओठावर येते
‘ शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! 
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! 
दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

error: Content is protected !!