पवनानगर : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून ग्रामपंचायत काले- पवनानगर मध्ये विविध विकास कामाचे उदघाटन व भूमिपूजन समारंभ खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितत करण्यात आला.
पोलीस चौकी ते किशोर शिर्के यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्यासाठी ५ लाख रुपये ,स्मशानभूमी निवारा शेड साठी ५ लक्ष , स्मशानभूमी सुशोभिकरण साठी ३लक्ष मुख्य रस्ता ते स्मशानभूमी रस्ता चा निधी देण्यात आला तसेच मुख्य रस्ता ते दुर्गा माता मंदिर ३ लक्ष मुख्य रस्ता ते भाऊसाहेब कुरे यांच्या घरापर्यंत ३ लक्ष तसेच अनिल कालेकर ते सुरेश विचारे यांच्या घरापर्यंत 3 लक्ष असा अशा पुर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका प्रमुख राजेश खांडभोर,मावळ रिपब्लिकनचे अध्यक्ष नारायण भालेराव, सरपंच खंडू कालेकर, उपसरपंच अमित कुंभार,संदीप भुतडा, किसन घरदाळे,विजय कालेकर, बबन कालेकर,चंद्रकांत दहीभाते संजय मोहोळ,विकास कालेकर,सचिन कालेकर,किशोर शिर्के, संतोष शिंदे,तेजस गांधी,प्रवीण वैष्णव,ग्रामपंचायत सदस्य फुलाबाई कालेकर,आशा कालेकर, रमेश कालेकर,उत्तम चव्हाण, ग्रामसेवक रवींद्र वाडेकर,मधुकर काळे, बाळासाहेब पवार, नारायण कालेकर, चंद्रकांत कालेकर,जयदीप कुंभार, भाऊसाहेब कुरे,आकाश वाळुंज, शंकर दळवी,छबन काळे,तानाजी लायगुडे,रवीकांत रसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बारणे म्हणाले की, गेल्या दिड वर्षांपासून कोरोनामुळे सर्व खासदारांचे निधी बंद करण्यात आला होता परंतु तरीदेखील मावळातील अनेक गावांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्यात आला आहे.आगामी काळात मोठा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.यावेळी पवन मावळासाठी तसेच काले ग्रामपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच खंडुजी कालेकर, उपसरपंच अमित कुंभार व सर्व सदस्यांच्या हस्ते बारणेंचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन काले गावचे उपसरपंच अमित कुंभार यांनी केले.

error: Content is protected !!