वडगांव मावळ :
मावळ तालुका व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत विविध कार्यकारी सोसायटी कडून घेतलेल्या कर्जाची नियमित व वेळेवर परतफेड करणाऱ्यांना शासनाने जाहीर केलेले पन्नास हजार रुपये प्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी,किसान मोर्चा मावळ तालुका यांचे वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण, आंदोलन गुरुवार २० जानेवारी रोजी तहसील कार्यालय आवारात करण्यात येणार आहे.
या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांना देण्यात आले. यावेळी किसान मोर्चा अध्यक्ष सुभाष धामणकर, कार्याध्यक्ष विकास शेलार ,वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे, , राजाराम असवले, किसन सावळे, किसन येवले, हरिभाऊ दळवी, संतोष काळे, किसन अंबोले, संतोष येवले, आदीजण उपस्थित होते.
नियमित व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत सरकारने देण्याचे जाहीर केले होते परंतु सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संताप व नाराजी असून त्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड नियमित व वेळेत करून चूक तर केली नाही ना कर्जाची परत फेड करावी की नाही असे संभ्रमावस्था व मनस्थिती शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!