पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे
पुणे :
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे यांची निवड करण्यात आली आहे. तर सुनील चांदेरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
या दोन्ही पदांसाठी पवार आणि वळसे यांच्या मर्जीतील संचालकाची निवड होणार होती है या निवडीवरून स्पष्ट झाले होते.
बँकेच्या २१ संचालकांची निवडणूक नुकतीच झाली. काही जण बिनविरोध नविडून आले तर काहींनी दिग्गजांना पराभूत केले. यात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. त्यानंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठरले.प्रा. दुर्गाडे व चांदेरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असून राष्ट्रवादीचे सक्रीय नेते आहे. चांदेरे यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटने पासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.

error: Content is protected !!