मावळ तालुका गुणवंत शिक्षक पुरस्काराने भरत शेटे सन्मानित
वडगाव मावळ
पंचायत समिती,मावळ सभापती,उपसभापती व सदस्य यांनी आयोजित केलेल्या ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण’ समारंभात बधालेवस्ती शाळेचे आदर्श शिक्षक भरत शेटे यांना सन्मानित करण्यात आले.
राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी भाजपा राज्य उपाध्यक्षा चित्राताई वाघ,मा.राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे,मा.आमदार दिगंबरदादा भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,भास्करराव म्हाळसकर,सभापती ज्योती शिंदे,मा.उपसभापती दत्तात्रय शेवाळे,मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर,शांताराम कदम,सुवर्णा कुंभार,निकीता घोटकुले,जिजाबाई पोटफोडे इ.मान्यवर उपस्थित होते.
भरत शेटे सर हे उपक्रमशील शिक्षक असून विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शाळा भौतिकदृष्ट्या संपन्न केलेली आहे.बधालेवस्ती शाळेस मावळ तालुक्यातील पहिली आय.एस.ओ वस्तीशाळा हा सन्मान मिळाला असुन येथील शालेय गुणवत्तेचे अनेकांनी कौतूक केलेले आहे.नवलाख उंबरे केंद्रातील निगडे येथील आय.एस.ओ शाळेचे शिक्षक अजिनाथ शिंदे यांनाही हा तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त झाला .
हे दोन्हीही विद्यार्थी हितदक्ष गुरुजनांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने सर्वत्र कौतूक होत आहे.

error: Content is protected !!