कामशेत:
येथील महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्था अनुदानित आश्रम शाळेत” जिजाऊ ते सावित्री” सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभिमान पंधरवडा राबविण्यात येत आहे। राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे प्रतिमा पूजन करुन महर्षी कर्वे आश्रम शाळेत साजरी करण्यात आली.
आश्रमशाळेच्या स्त्री अधिक्षिका सारीका पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. आश्रम शाळेत इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थिनीं राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा पेहराव (वेशभूषा) केली. सदर कार्यक्रमात इयत्ता इयत्ता आठवी, (ऑनलाइन) भाषण केले. सानिका मडके,रविना मोहिते नववी काजल चिमटे दहावीच्या प्रज्ञा भगत या विद्यार्थिनी मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल आपले विचार मांडले. तसेच माध्यमिक शिक्षक अजित डुंबरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल माहिती सांगितली.
तसेच इयत्ता नववी च्या मुलींनी जिजाऊ मासाहेब यांच्या जीवनावर गीत सादर केले. तसेच आपल्या शाळेतील प्राथमिक शिक्षिका (टेक्नोसॅव्ही) प्रेमकला वैभव पाठक यांनी जिजाऊ माॅसाहब यांच्या जीवनावर एकपात्री नाटिका सादर केली. सदर कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद व विद्यार्थींनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पंढरीनाथ वाडेकर सर यांनी केले.

error: Content is protected !!