वडगाव मावळ:
मावळचे आमदार सुनिल शेळके यांंच्या वर केलेल्या बेछूट आरोपाचा समाचार घेण्यासाठी, तसेच जातीय तेढ निर्माण होईल असे अक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांच्या प्रतिमेला जोडो मारो अंदोलन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतले आहे.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी,युवक,महिला, विद्यार्थी व कार्यकर्ते १३ जानेवारी २०२२ सकाळी ११.३० वाजता शासकीय विश्रामगृह वडगाव मावळ येथे उपस्थितीत राहणार आहेत.
मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या वर झालेले आरोप तसेच समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भातखळकर यांच्या प्रतिमेवर जोडो मारो आंदोलन करण्यात येणार आहे, आमदार शेळके यांची नाहक बदनामी सहन केली जाणार नाही असा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादीने घेतला आहे.
मावळचे तहसीलदार यांनी भातखळकर यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशा आशयाचे निवेदन देण्यात येणार आहे.बबन भेगडे: (अध्यक्ष रा.काँ. मावळ),विट्ठलराव शिंदे (सदस्यः पुणे जि.नि.स),बापुसाहेब भेगडे (उपाध्यक्षः संत तु.सा.का),सुभाष जाधव (अध्यक्ष रा.काँ. ग्रामीण ब्लॉक मावळ),दिपक हूलावळे (कार्याध्यक्ष रा.काँ. मावळ),सचिन घोटकुले (अध्यक्ष रा.यु.काँ. पुणे जि.),सुवर्णा राऊत(अध्यक्ष रा. महिला काँ. मावळ)
-सुनिल दाभाडे(अध्यक्ष रा.यु.काँ. मावळ),निशा पवार (अध्यक्ष रा.युवती काँ. मावळ),नवनाथ चोपडे (अध्यक्ष रा.वि.काँ. मावळ),अतुल राऊत (कार्याध्यक्ष रा.काँ. ओबीसी सेल पुणे जि),आफताब सय्यद (अध्यक्ष रा.काँ. अल्पसंख्यांक सेल मावळ), संजय शेडगे ( अध्यक्ष रा काँ सोशल मीडिया) यांच्यासह सह राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी होणार आहेत.

error: Content is protected !!