वडगाव मावळ:
टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीला आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान पुरस्काराने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरविण्यात आले.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान पुरस्कार सन-२०२०/२०२१ प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण विभागस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून मावळ तालुक्यातील उद्योग नगरी म्हणून ओळखली जाणारी ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतील पुणे जिल्हा मध्ये प्रथम क्रमांकचा बहुमान मिळाला.                      आंदर मावळातील उद्योगनगरी म्हणून ओळखली जाणा-या टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतील हा बहुमान मिळाल्याने गावक-यांनी आनंद व्यक्त केला.
सरपंच भूषण असवले, ग्रामविकास अधिकार एस.बी.बांगर,माजी उपसरपंच ऋषीनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी सभापती ज्योती शिंदे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,माजी सभापती सुवर्णा कुंभार, माजी उपसभापती शांताराम कदम, माजी उपसभापती जिजाबाई पोटफोडे, गटनेते साहेबराव कारके, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, युवक अध्यक्ष कैलास गायकवाड उपस्थितीत होते.
सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सरपंच भूषण असवले म्हणाले,” आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पातळीवर काम करताना सर्व ग्रामपंचायत सदस्य,प्रशासकीय अधिकारी,लोकप्रतिनिधींनी केलेल्या सहकार्याने हा पुरस्काराने मिळाले. ही प्रेरणा घेऊन अधिक चांगले काम करण्यासाठी प्रयत्नशील राहील.

error: Content is protected !!