मावळमित्र न्यूज विशेष:
घरची परिस्थिती बेताची.सर्वसामान्य शेतकरी कुटुंब. पण सामाजिक वसा लाभलेले. तितकाच राजकीय वारसा देखील. हाताला काम मिळावे म्हणून ऐंशीच्या दशकात त्याचे वडील तालुक्याच्या गावात राहू लागले. कुटूंब चालवताना लागणारी सर्व जबाबदा-या पार पाडीत काही वर्षे लोटली. आणि लेक हाताशी आला. हाताशी आलेला लेक बापाच्या आधाराची काठी. तोही असाच काठी बनला आणि आपल्या कुटुंबाशी साठी जबाबदार लेक ठरला.
वैभव हरिश्चंद्र वाडेकर असे त्याचे नाव.कसलाही दिखाऊपणा नाही की,बडेजाव नाही. आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडीत असताना जीवाभावाचे मित्र मिळवायचे आणि त्याच्या सुख दु:खात सहभागी होऊन आनंदाने राहायचे हाच त्याचा जीवनक्रम. अत्यंत संवेदनशील आणि तितक्याच हळव्या मनाचा वैभव. खूप मोठी स्वप्न मनात साठवलेला आणि त्यासाठी रात्रंदिवस धडपड करणारा,धावणारा हा तरूण परिस्थितीवर मात करीत यशस्वी पाऊले टाकीत आहे.
त्याच्या या पाऊलाला बळ मिळेल हा विश्वास घेऊन तो राबतोय,कष्ट करतोय धडपड करतोय हे पाहताना मनात एक वेगळे समाधान आणि आनंद आहे. बालवयातच उन पावसाचे चटके सहन असले तरी यातून बाहेर पडता येते आणि यशस्वी होता या सकारात्मक बीजाचे रोपण त्याने मनावर घातलेच आहे.त्याच्या या संघर्षात आई,वडीलांचे आशीर्वाद,बहीण भावांच्या आणि आप्तस्वकीयांच्या शुभेच्छा आणि पत्नीची साथ आहे.
अगदी वहानगाव सारख्या खेड्यातील हा तरूण शहरात कष्ट करून राहतो,त्याला नक्कीच सुगीचे दिवस आहे.चांगले कर्म करणाऱ्याला नियती मदतीची ओजळ भरून उभी असते ही ओंजळ त्याला यशस्वी करेल याच वाढदिवसानिमित्त अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.

error: Content is protected !!