तळेगाव दाभाडे:
भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा तळेगाव दाभाडे शहर गाव विभागाच्या वतीने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून किनारा वृध्दाश्रमात येथे वृद्धांसाठी रजई आणि खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी वृध्दाचे अश्रू अनावर झाले. परंतु त्यांचे ते आनंद अश्रू म्हणावे लागतील.किनारा वृध्दाश्रम संस्थापिका प्रिती वैद्य तुमच्या या सामाजिक कार्याला मनापासून सलाम असल्याच्या भावना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
राजमाता जिजाऊ महिला मंचाच्या संस्थापिका सारीका भेगडे, पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे ,पवन मावळ कार्याध्यक्षा सुमित्रा जाधव, सरचिटणीस रजनी ठाकूर, संघटन मंत्री कल्याणी ठाकर, तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षा मोहिनी भेगडे, कार्याध्यक्षा अश्विनी काकडे, प्रसिद्धी प्रमुख सोनाली शेलार, उपाध्यक्ष निलम भेगडे, सरचिटणीस मीना भेगडे,सचिव-संजोगता आगळे,उपाध्यक्ष- संगीता भेगडे, उपाध्यक्ष अनिता भेगडे सचिव रूपाली भेगडे उपस्थितीत होत्या.
मोहिनी भेगडे यांनी स्वागत केले.तर निलम भेगडे यांनी सुत्रसंचालन केले.आणि सोनाली शेलार यांनी किनारा वृध्दाश्रमाविषयी व प्रिती ताई वैद्य यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.अश्विनी काकडे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!