पिंपरी:
येथील महात्मा ज्योतिबा फुले मंडळ पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने संस्कार प्रतिष्ठानच्या अनुशा पै यांचा ‘ कोरोना योद्धा ‘ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
संस्कार प्रतिष्ठानची धडाडीची व धाडसी सभासद कोरोनाच्या दोन्हीही लाटेमध्ये तब्बल २०० दिवस घरोघरी जाऊन विविध प्रकारची मदत,गरजू कामगार बंधुंना धान्याचे किट वाटप करीत होते.
२८ प्रकारच्या सेवांमध्ये पुढाकार घेऊन मदत केल्याबद्दल आज महात्मा ज्योतिबा फुले मंडळ पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने करोना योध्दा समाजभुषण पुरस्कार संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे व शिर्डी संस्थांच्या सी ई ओ भाग्यश्री बानाईत यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ.मोहन घोलप म्हणाले,” कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल पडलेली ही कौतुकाची थाप, या पुढील काळात अधिक काम करण्यासाठी प्रेरक व उर्जा आहे.सामाजिक बांधिलकी मानून आम्ही मंडळी काम करीत आहोत. यासाठी सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा पाठीशी आहेत.

error: Content is protected !!