
कुसूर :
मावळ तालुक्यातील अतिदुर्गम खांडी केंद्राची शिक्षण परिषद मोरमारेवाडी ( कुसूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संपन्न झाली.यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन खांडी केंद्राचे केंद्रप्रमूख गंगाराम केदार,खांडी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल साबळे,डाहुली शाळेचे मुख्याध्यापक यशवंत पवार,मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे मा.तज्ञ संचालक विनायक पारखे,खंडू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधून आंदर मावळातील खांडी केंद्रासारख्या दुर्गम भागात पवित्र ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या सर्व महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला.केंद्रात निळशी येथे नव्याने रुजू झालेल्या सुनिता गवारी यांचे स्वागत करण्यात आले.सुवर्णा वाडिले यांनी ‘माझ्या मावळची सावित्री’ ही कविता सादर करुन नारीशक्तीचे महत्व विषद केले.
बेंदेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली निमकर व निळशी शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता दाते यांनी शिक्षण परिषद पूर्वचाचणी,निष्टा FLN नोंदणी यांविषयी मार्गदर्शन केले.दिपाली पारखे व रुपाली गायकवाड यांनी अध्ययन स्तर निश्चिती कशी करावी तसेच त्यांचे संकलन यांविषयी माहिती सांगितली.
यावेळी मुलनिहाय आराखडा कसा तयार करावा तसेच त्यातून साध्य होणारी उद्दिष्टे कोणती यांवर चर्चा करण्यात आली.चर्चेमध्ये शिवाजी चौगुले,दत्तात्रय डावखर,सुशिल कांबळे यांनी सहभाग घेतला.कृती आराखडा कसा तयार करावा याविषयी मार्गदर्शन राहूल राठोड,रामेश्वर बागडे यांनी केले.दहा कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन विद्यार्थीहीतासाठी विविध उपक्रम योजावेत अशी सुचना केंद्रप्रमूख गंगाराम केदार यांनी केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक उमेश माळी यांनी तर आभार कुसूर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता भोसले यांनी मानले.शिक्षण परिषदेचे यशस्वी संयोजन राजू वाडेकर यांनी केले.
- पुन्हा एकदा संस्कार प्रतिष्ठान महाराज्यच्या यशात मानाचा तुरा
- कान्हे रेल्वे उड्डाणपुलास ग्रामस्थांचा विरोध
भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन - वरसुबाई विद्यालयात वह्यांचे वाटप
- भारतीय जनता पक्ष उत्तर भारतीय आघाडी तळेगाव दाभाडे शहर कार्यकारिणी जाहीर
- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप






