पवनानगर : येळसे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील पवना शिक्षण संकुलातील पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील ४०० शालेय विद्यार्थ्याच्या कोरोना लसीकरण करण्यात आले.
या लसीकरण मोहिमेचे उद्घाटण पुणे जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले ,पंचायत समितीचे माजी उपसभापती जिजाबाई पोटफोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी लोहगड सोसायटीचे अध्यक्ष गणेश धानिवले,काले ग्रामपंचायतीचे सरपंच खंडुजी कालेकर, उपसरपंच अमित कुंभार,माजी उपसरपंच संदिप भुतडा, प्राथमिक आरोग्य केंद्र येळसेचे आरोग्य अधिकारी डॉ.पोपट अदाते,डॉ.राजेंद्र मोहिते, शाळेच्या प्राचार्या अंजली दौंडे, पर्यवेक्षिका निला केसकर आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण देशामध्ये तीन जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना लसीकरण मोहिम सुरु केली आहे
आज पवना विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज येथील ४०० विद्यार्थ्यांनी लसीकरणाच्या लाभ घेतला पहिल्यांदाच लस घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले म्हणाल्या की, कोरानामुळे गेल्या दिड वर्षाच्या कालखंडात शाळा बंद होत्या परंतु केंद्रशासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना लसीकरण मोहिम सुरु झाली आहे लसीकरणामुळे कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही तरीदेखील कोरानाचे नियमांचे पालन करून आपण कोरोनाचा मुकाबला करायचा आहे.
हि संपूर्ण लसीकरण मोहिम प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पोपट अदाते,डॉ राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक नंदकुमार क्षीरसागर,आरोग्य सेवक,राहूल जाधव,सुवर्णा पायगूडे, रश्मी गायकवाड, चैताली सुतार यांनी यशस्वीरीत्या संपन्न झाले यासाठी सेव्ह द चिल्ड्रन्स सामाजिक संस्थेचे राहूल पंचांग,आकाश ठाकर, विशाल गोणते, मधुकर कांबळे,प्रविण रावुंडे, प्रितम अडिवळे,शुभम खिरडकोर यांनी मोलाची मदत केली.यावेळी सर्वांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोशनी मराडे, सुत्रसंचलन भारत काळे यांनी केले तर आभार गणेश ठोंबरे यांनी मानले.

error: Content is protected !!