कामशेत:
नववर्षाच्या पूर्वेला जागृती सेवा संस्था व महावीर हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने कामशेत येथील महिला व युवतींसाठी ‘आरोग्य साथी” या थीमवर
मोफत परिचारिका प्रशिक्षण शिबीर सुरू करण्यात आले आहे ,नोंदणी केलेल्या गरजू महिला किंवा युवतींना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती महावीर हाॅस्पिटल च्या संचालिका व खडकाळा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या अंजना विकेश मुथा यांनी दिली.
या प्रशिक्षणाचा शुभारंभ सोमवार ता.३.१.२०२२
११ वाजता होणार आहे.जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक मनिषा माने , ग्रामपंचायत सदस्या अंजना मुथा, वनिता वाघवले, सुनिता जोशी , वैशाली ढिले, संजय पानकर,सुनिल पानकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
महावीर हाॅस्पिटलच्या वरच्या मजल्यावर हा उद्घाटन सोहळा होणार असून वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणार आहे.
प्रशिक्षणानंतर शासकीय प्रमाणपत्र दिले जाणार असून नोकरीची हमी महावीर हाॅस्पिटलच्या वतीने देण्यात आली आहे. ग्रामपंचायत सदस्या अंजना मुथा यांनी मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत ‘आरोग्य सेवे सोबत महिला सक्षमीकरण,महिला प्रशिक्षण हा शब्द मतदारांना दिला होता.
हा शब्द पूर्ण करण्याच्या हेतूने हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे मुथा यांनी सांगितले. प्रथम नोंदणी करणा-या आणि किमान दहावी पर्यंत शिक्षण झालेल्या गरजूंना प्रशिक्षणार्थीना संधी दिली जाणार आहे.

error: Content is protected !!